शिवराज्याभिषेक दिन प्रश्नमंजुषा | Quiz On Shivrajyabhishek Day

 शिवराज्याभिषेक दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2023 

Quiz On Shivrajyabhishek Day
Quiz On Shivrajyabhishek Day 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीय आणि परकीय यांच्याशी संघर्ष करून आपला राज्यविस्तार केला. परंतु त्या काळामध्ये इतका पराक्रम करून देखील त्यांची ओळख एक मोगल सत्तेचे मनसबदार अशीच काहीशी धारणा होती.हे सर्व बदलून औरंगजेबाला आव्हान देणे यासाठी राज्याभिषेक करणे गरजेचे होते. हा राज्याभिषेक करण्यामागे कोणताही मोठेपणा दिखाऊपणा अजिबात नव्हता.

आपण ज्या प्रदेशांमध्ये आपले स्वराज्य निर्माण केले आहे. त्या प्रदेशाला एक शिस्त लागावी लोकांना एक सुरक्षितता मिळावी.यासाठी आपला कोणतरी राजाही आहे.आपल्याला कोणतरी वाली आहे आणि यासाठीच , म्हणून महाराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचे ठरवले.

6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्वाची घटना म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारत परकिय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता. ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहितीसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केले आहे.  प्रश्नमंजुषेमध्ये  25 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. सर्वांनी प्रश्नमंजुषा सोडवावी. 

' प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र '  ही मिळवा. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 15 प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र ईमेल आयडी  वर भेटणार असल्याने सर्वांनी ईमेल आयडी अचूक नोंदवावा. 

चला तर मग चाचणी सोडवू या. !!!!!



प्रश्नमंजुषा सोडविल्यानंतर ईमेल आयडीवर प्रमाणपत्र मिळणार आहे. तरी सर्वांनी प्रश्नमंजुषे मध्ये भाग घेऊन सोडवावी. 



 


नवनवीन माहितीसाठी

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या