डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोषवाक्ये | Ghoshvakye Dr. Babasaheb Ambedkar

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर  घोषवाक्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोषवाक्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोषवाक्ये
                        
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.

आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला.

१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.                

तरुण डॉ. आंबेडकर मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच भीम, भीमा व भीमराव नावानेही कुटुंबिय व शेजारी लोक त्यांना हाक मारत.

भीमराव आई-वडिलांचे १४वे अपत्य होते. त्यांचे कुटुंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि मूळचे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात 'bharatratna dr.babasaheb ambedkar nibandh in marathi' असलेल्या आंबडवे गावचे होते. (आंबडवे या गावचा अंबावडे असा चूकिचा उल्लेख पूर्वी अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)

भीमरावांचे वडीलही ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. इ.स. १८९६ मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ‘कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही.

यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले.

त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) कर शब्द जोडण्याचा प्रघात असे.

त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही अंबावडेकर असा चूकीचा उल्लेख केलेला आहे. साताऱ्याच्या या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरूखे ब्राह्मण शिक्षक होते.
                      
💥  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत काही निवडक घोषवाक्ये खालील  
देण्यात आलेली आहेत. 

शिल्पकार तुम्ही राज्यघटनेचे ,पंडित तुम्ही कायद्याचे

प्रचारक तुम्ही समतेचे , भारतरत्न तुम्ही देशाचे !!!

 

बुद्धा सारखं होत  ज्ञान , देऊन गेले संविधान

शिकविले शिक्षणाचे ज्ञान , मिळवून दिले समाजात स्थान…!!

 

दलितांचे कैवारी तुम्ही , गोरगरिबांचे उध्दारक तुम्ही

बाबासाहेब तुमच्या कर्तुत्वामुळे , सर्वांना मिळाली जगण्याची हमी...!!

 

करून जीवाचे रान , दिला  सर्वांना समतेचा मान

अशी भीमरावांची शान, लिहिले भारताचे संविधान…!!

 

अंधार होता ज्यांच्या नशिबी , त्यांना प्रकाशाचे दान दिले

तुमचे मानावे किती उपकार , बाबासाहेब तुम्हीच देशाला दिले संविधान…!!

 

मोजू किती कशी ऊंची , तुमच्या कर्तुत्वाची

तुम्ही जगण शिकविली ,  व्याख्या माणुसकीची ... !!

 

जातीभेदाची भिंत तोडली , अनियतीशी युध्दे  लढली

बाबासाहेब तुम्ही होता,  म्हणूनच क्रांती घडली ... !!

 

संघर्षाने  केलात आपण , कुप्रथांचा -हास

महामानव आपण , रचियला अमर इतिहास.. !!

 

अन्यायाविरुद्ध लढण्याचे होते , लेखणी  हेच साधन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , यांना  त्रिवार अभिवादन... !!

 

नमन त्या पराक्रमाला , नमन त्या देशप्रेमाला

नमन त्या ज्ञानसूर्याला , नमन त्या महापुरुषाला , नमन त्या बाबासाहेबांना ... !!

 

जरी वेगळ्या भाषा असल्या , तरी एकता कायम आहे,

बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात , समानतेचा नियम आहे. .!!

 

आशिया,रशिया, युरोप,चीन ,जपान  ,

साऱ्या  जगात एक नंबर , माझे संविधान ... !!

 

काश्मीर ते कन्याकुमारी , सर्वांचे हक्क एकसमान

सर्वांना एकजूट ठेवते , माझे भारतीय संविधान... !!

 

 

निरपेक्षतेचा बाणा , एकात्मेचं  गाणं

हक्क आणि कर्तव्याची जाण, लोकशाहीचा मान ,

भारताची शान ,डॉ. आंबेडकरांनी रचले ही संविधान ... !!

 

उठ नागरिक जागा हो,

संविधानाचा धागा हो... !!

 

💥डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत काही निवडक घोषवाक्येपीडीएफ फाईल मध्ये दिलेली आहेत. 



नवनवीन माहितीसाठी

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या