अध्ययन निष्पत्ती इयत्ता 4 थी | Learning Outcomes STD 4th

 अध्ययन निष्पत्ती इयत्ता 4 थी  | Learning Outcomes STD 4 th 

Learning Outcomes STD 4th
Learning Outcomes STD 4th 


अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? 

"विद्यार्थ्याने विषय शिकल्यानंतर काय  साध्य झाले पाहिजे त्याला कोणती कौशल्ये आत्मसात झाली पाहिजे कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे यालाच learning outcomes किंवा अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात." 

"शैक्षणिक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षमता आत्मसात केल्या ? हे पाहायला पाहिजे. ह्या क्षमता म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय."

वर्गाच्या प्रत्येक वर्षीच्या क्षमता ठरवलेल्या असतात. वर्षाच्या शेवटी मुलांनी या क्षमता अवगत करणे आवश्यक असते. मुलांनी त्यात प्रवीण असायला हवे, अशा बाबतीत अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्या असे म्हणता येईल.

अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा- 

अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास असायला हवा. त्यावर आधारित कोणते अध्ययन अनुभव मुलांना देता येणे शक्य आहे याचा विचार करायला हवा.अध्ययन निष्पत्ती व छोट्या छोट्या कृतींचा मेळ वर्गाच्या स्तरावर घातला पाहिजे.



  इयत्ता चौथीसाठी  कोणकोणत्या अध्ययन निष्पत्ती आहेत. ते आपण खाली पाहू.

इयत्ता चौथी अध्ययन निष्पत्ती  विषय - मराठी 

                 अध्ययनार्थी- 

04.18.01 इतरांकडून सांगितली जाणारी गोष्ट लक्षपूर्वक ऐकून त्यावर आपाले मत व्यक्त करातात व प्रश्न विचारतात.

04.18.02 ऐकलेल्या साहित्य प्रकारांतील विषय, घटना, चिञ, पाञ, शिर्षक यांविषयी चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपले मत व्यक्त करतात व ते पटवून देताना त्यामागील विचार सांगतात.

04.18.03 कथा, कविता किंवा इतर साहित्याविषयी सांगताना त्यांत आपल्या स्वतःच्या विचारांची भर घालतात

04.18.04 स्वतःचे म्हणणे मांडताना भाषेच्या विविध वैशिष्ट्यांचा बारकाईने वापर करतात.

04.18.05 विविध साहित्य (उदा. वर्तमानपञांतील बातम्यांचे शीर्षक, बालसाहित्य) यांमध्ये आलेल्या नैसर्गिक, सामाजिक तसेच इतर संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांवर चर्चा करतात.

04.18.06 वाचलेल्या मजकूर आणि दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून त्यातून निर्माण झालेल्या संवेदना आणि विचार तोंडी/लेखी स्वरुपात व्यक्त करतात.

04.18.07 पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर मजकुराचे (बालसाहित्य, वर्तमानपञांतील ठळक शिर्षक, प्रसिद्धिफलक इत्यादी) यांचे समजपूर्वक वाचन करतात.

04.18.08 वेगवेगळ्या साहित्यरचनेत आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ संदर्भाने समजून घेतात.

04.18.09 वाचायला उत्सुक असतात आणि वाचनकोपरा / ग्रंथालयातून आपल्या आवडीची पुस्तके निवडतात व त्यांचे वाचन करतात.

04.18.10 वाचलेल्या रचनांमधील मुख्य विषय, घटना, चिञ, पाञ, शीर्षक यासंबंधी चर्चा करतात, आपले मत व्यक्त करतात, आपले म्हणमे पटवून देतात.

04.18.11 स्तरांनुसार इतर विषय, व्यवसाय, कला इत्यादीमध्ये (उदा गणित, विज्ञान, सामाजिक अभ्यास, नृत्यकला, चिकित्सा) वापरला जाणारा शब्दसंग्रह समजून घेतात.

04.18.12 भाषेतील विविध बारकावे उदा. शब्दांची पुन्नरावृत्ती, सर्वनाम, विशेषण, लिंग वचन इत्यादींविषयी राहून लेखन करतात.

04.18.13 एखाद्या विषयावर लिहिताना शब्दांचे बारकावे, त्यांतील अंतर समजून घेतात व लिहिताना शब्दांचा योग्य वापर करतात.

04.18.14 विशिष्ट परिस्थिती आणि उद्दिष्ट (विविध प्रकारच्या फलकांवर लावल्या जाणा-या सूचना, सामानाची सूची, कविता , गोष्ट, पञ इत्यादी) लक्षात घेऊन लेखन करतात.

04.18.15 स्वतःच्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरवलेल्या कृतीअंतर्गत लेखनप्रक्रिया समजून घेतात, स्वतःचे लेखन तपासून घेतात, लेखनांची उद्दिष्ट्ये आणि वाचक यांनुसार त्यात बदल करतात.

04.18.16 वेगवेगळ्या साहित्यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा आपल्या लेखनात वापर करातात.

04.18.17 विविध उद्देशांसाठी लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा (पूर्णविराम, अल्पविराम, प्रश्नचिन्ह इत्यादी) जाणीवपूर्वक वापर करातात.

04.18.18 आपल्या कल्पनेनुसार गोष्ट, कविता, वर्णन इत्यादी लिहिताना भाषेचा सर्जनशीलतेने वापर करतात.

इयत्ता चौथी  अध्ययन निष्पत्ती  विषय- गणित 

                  अध्ययनार्थी

04.71.01 दैनंदिन जीवनात संख्यांवरील क्रियांचा वापर करतात.

04.71.02 सम, विषम संख्यांचे वर्गीकरण करतात.

04.71.03 2 ते 3 अंकी संख्यांचा गुणाकार करतात.

04.71.04 विविध पध्दती वापरून एका संख्येंला दुस-या संख्येने भागतात. जसे – चिञरूपाने (ठिपके काढून) समान गट करून किंवा भागाकार गुणाकार यातला संबंध वापरून पुन्हा पुन्हा वजाबाकी करून.

04.71.05 नाणी, नोटा, लांबी, वस्तुमान आणि धारकता यांचा संबंध असणारे दैमंदिन जीवनातील प्रश्न किंवा प्रसंग तयार करण्यासाठी व सोडवण्यासाठी चार क्रियांचा उपयोग करतात.

04.71.06 अपूर्णांकाचा वापर करतात.कागदाची घडी घालून वस्तूंच्या दिलेल्या समूहावरून किंवा दिलेल्या चिञातील एका पूर्णाचा अर्धा, पाव, पाऊण भाग ओळखतात.अर्धा, पाव, पाऊण भाग अनुक्रमे 12 , 14 व 34 या चिन्हांनी दाखवितात. 12 आणि 14 , तसेच यांसारख्या इतर अपूर्णांकांची समतूल्यता दर्शवितात.

04.71.07 सभोताली आढळणारे आकार जाणून घेतात.

04.71.08 वर्तुळाचे केंद्र, ञिज्या, व व्यास ओळखतात.

04.71.09 टायलिंगसाठी वापरता योतील असे आकार शोधतात.

04.71.10 घडणीचा वापर करून घन व इष्टिकाचिती तयार करतात.

04.71.11 साध्या वस्तू वापरून, समोरून व बाजूने पाहिले असता खशा दिसतात त्याचे चिञ काढतात.

04.71.12 दिलेल्या आकारास एकक मानून साध्या भौमितीक आकारांचे (ञिकोण, आयात, चौरस) परिमीती व क्षेञफळ काढतात. उदा टेबलाचा पृष्ठभाग पूर्णपणे झाकण्यासाठी लागणा-या पुस्तकांची संख्या.

04.71.13 मीटरचे सेमी मध्ये आणि सेमीचे मीटर मध्ये रीपांतर करतात.

04.71.14 एखाद्या वस्तूची लांबी, दोन ठिकाणांतील अंतर, विविध वस्तूंची वजने, भांड्यातील द्रवाचे आकारमान इत्यादींचा अंदाज करतात. नंतर प्रत्यक्ष मोजून पडताळा घेतात.

04.71.15 लांबी, अंतर, वजन, आकारमान यासंबंधीचे, दैनंदिन जीवनातील चार मुलभूत गणिती क्रियांचा अंतर्भाव असणारे प्रश्न सोडवितात.

04.71.16 तास व मिनिटे यात घड्याळातील वेळ सांगतात. दिलेली वेळ मध्यान्हपूर्व व मध्यान्होत्तर वेळेच्या रूपात सांगतात.

04.71.17 चोवीस तास घड्याळ व बारा ताशी घड्याळ यांतील संबंध सांगतात.

04.71.18 दैनंदिन जीवनातील घटनांना लागणारा वेळ किंवा घटनांमधील कालवधी पुढे व मागे मोजून , तसेच बेरीज – वजाबाकी करून गणन करतात.

04.71.19 गुणाकार व भागाकारातील आकृतीबंध (9 च्या पटीपर्यंत) ओळखतात

04.71.20 चिञलेखावरून अनुमान काढतात.

MY ENGLISH BOOK FOUR –STD FOUR – LEARNING OUTCOMES

         The Learner –

04.17.01 Listens attentively to announcement and note the message.

04.17.02 Guess the meaning of words, phrases and sentences form the context.

04.17.03 Enjoys and recites poems, songs and rhymes with proper actions, rhythm and appropriate expressions.

04.17.04 Participate and enacts in role play, short skits, playlets with interest.

04.17.05 Respond and follows simple instruction / announcement / requests in English and act accordingly.

04.17.06 Listen and responds attentively to stories, narrations, descriptions etc. in English and follows the meaning.

04.17.07 Reads English seen in the surroundings with understanding and at reasonable speed.

04.17.08 Tells / shares jokes and riddles in English for entertainment.

04.17.09 Guesses the meaning of words, phrases, sentences form the context and solves simple crossword puzzles, builds word chain etc.

04.17.10 Reads and finds the meaning of few words form a dictionary for reference,. Looks Up the spelling of words form a dictionary.

04.17.11 Listen to words / sentence and writes them down.

04.17.12 Uses punctuation marks appropriately in reading aloud with intonation and pauses such as question marks, comma and full stop.

04.17.13 Writes informal letters or messages with a meaningful representation.

04.17.14 Reads English seen in the surrounding with understanding and reasonable speed on the classroom walls, notice boards, in posters and in advertisement.

04.17.15 Uses noun, verb, adjective and preposition in speech and writing.

04.17.16 Understands and use proper greeting and farewells.

04.17.17 Participates in a conversation and speaks briefly on a familiar topic.

04.17.18 Reads and understands map and graphics.

04.17.19 Reads text written by different people.

04.17.20 Compares various programmers with some preparation.

04.17.21 Writes a continuous and meaningful passage.

04.17.22 Writes a description of given process.

04.17.23 Describe things, pictures, events etc. in English using simple and short sentences.

अध्ययन निष्पत्ती  इयत्ता चौथी : परिसर अभ्यास भाग-

   

अध्ययनार्थी

04.95A.01 लगतच्या परिसरातील फुले, मुळे, फळे यांचे (आकार,रंग आणि गंध तसेच कोठे वाढतात व तत्सम ) सामान्य वैशिष्ट्ये ओळखतात. पक्षी आणि प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये ओळखतात, जसे की, चोच/दात, पंजे, कान, केस, घरटे/निवारा इत्यादी.

04.95A.02 विस्तारित कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध ओळखतात.

04.95A.03 प्राण्यांचे समूह व समूहांतर्गत वर्तन (उदा. मुंग्या, मधमा शी,हत्ती , पक्ष्यांचे वर्तन) विशद करतात. कुटुंबातील बदल (उदा.जन्म, लग्न, बदली इत्यादींमुळे होणारे बदल) स्पष्ट करतात.

04.95A.04 दैनंदिन जीवनातील कौशल्याधारित कामे (शेती, बांधकाम ,कला, हस्तकला) त्यांचा वडीलधाऱ्यांकडून मिळणारा वारसा व प्रशिक्षण संस्थांची भूमिका यांचे वर्णन करतात.

04.95A.05 स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनाश्यक वस्तूंच्या निर्मिती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात. (उदा. अन्न, पाणी, वस्त्र)

04.95A.06 भूतकाळातील आणि सध्याच्या वस्तू आणि कृती यांमधील फरक सांगतात. (उदा.परिवहन, चलन, घरे, साहित्य, साधने,कौशल्ये इत्यादी)

04.95A.07 प्राणी, पक्षी, वनस्पती, वस्तू, टाकाऊ पदार्थ, सामग्री यांचे गट तयार करतात. (उदा. दृश्य स्वरूप, गुणविशेष,वापर इत्यादी)

04.95A.08 प्रमाणित व स्थानिक एककांमध्ये (किलो, गज, पाव) गुणधर्म ,इत्यादींचा अंदाज बांधतात , अवकाशीय राशींचा (लांबी,वजन, वेळ, कालावधी इत्यादी) अंदाज घेतात तसेच सामान्य साधने वापरून सत्यता पडताळतात.

04.95A.09 निरीक्षणे /अनुभव/ माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृति बंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. बाष्पीभवन, संघनन, शोषण, विरघळणे)

04.95A.10 नकाशाचा वापर करून वस्तू /ठिकाणे यांच्या खुणा / स्थान ओळखतात व जवळच्या खुणेवरून शाळा / शेजार यांच्या दिशांचे मार्ग दर्शन करतात.

04.95A.11 दिशादर्शक पाट्या, पोस्टर, चलन, रेल्वे तिकीट,वेळापत्रकावरच्या माहितीचा वापर करतात. चलनी नोटा,शाळा/ शेजार, प्रवाह तक्ते इत्यादींच्या प्रतीकृती, रांगोळी,भित्तिपत्रक, अल्बम, साधे नकाशे, (शाळा परिसर)इत्यादींची निर्मिती करतात. त्यासाठी स्थानिक उपलब्ध/टाकाऊ वस्तूंचा वापर करतात.

04.95A.12 कुटुंब/ शाळा / शेजार या ठिकाणी निरीक्षण केलेल्या /अनुभवलेल्या समस्यांवर स्वतःचे मत मांडतात, (उदा. साचेबद्धपणा/ भेदभाव/ बालहक्क)

04.95A.13 आरोग्य रक्षण, कचरा कमी करणे, त्याचा पुनर्वापर करणे,त्यावर पुन:प्रक्रिया करून उपयोगात आणणे यांसाठी मार्ग सुचवितात आणि विविध सजीव संसाधने (अन्न, पाणी व सार्वजनि क मालमत्ता ) यांची काळजी घेतात.

04.95A.14 गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था , समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor)/वर्गाबाहेरील (Outdoor)/स्थानिक/समकालीन उपक्रम आणि खेळ तसेच वनस्पतींची काळजी घेणे, पशु-पक्ष्यांना खायला देणे, भोवतालच्या वस्तू /वडीलधारे / दिव्यांग यांच्या साठी प्रकल्प करणे / भूमिका करतात.

04.95A.15 नकाशात जिल्हे व राज्या नुसार प्रमुख खाद्यान्न पिके व प्रसिद्ध खाद्यपदार्थ दाखवतात.

04.95A.16 नकाशातील चिन्हे , खुणा व सूची यांचा वापर करून नकाशाचे वाचन करतात.

04.95A.17 आपला जिल्हा व राज्य यांची प्राकृतिक व मानवनिर्मित घटक या अनुसंधाने तुलना करतात.

04.95A.18 भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रांमधील विविधता सांगतात.


इयत्ता चौथी अध्ययन निष्पत्ती  परिसर अभ्यास भाग-

                अध्ययनार्थी

04.95B.01 विस्तारित कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध ओळखतात.

04.95B.02 कुटुंब/ शाळा / शेजार या ठिकाणी निरीक्षण केलेल्या / अनुभवलेल्या समस्यांवर स्वतःचे मत मांडतात, (उदा.साचेबद्धपणा/ भेदभाव/ बालहक्क)

04.95B.03   गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था , समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात.उदा.वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक / समकालीन उपक्रम आणि खेळ तसेच वनस्पतींची काळजी घेणे, पशु-पक्ष्यांना खायला देणे, भोवतालच्या वस्तू /वडीलधारे /दिव्यां ग यांच्यासाठी प्रकल्प करणे /भूमिका करतात.

04.95B.04 छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामधील विविध स्फूर्तीदायी घटना सांगतात.

04.95B.05 चातुर्य , धैर्य आणि विवेक यांच्यामुळे संकटावर मात करता येते. हे शिवचरित्रातून आत्मसात करतात.

04.95B.06 भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रांमधील विविधता सांगतात.

ज्या  शिक्षक बांधवांना  इयत्ता चौथीच्या अध्ययन निष्पत्ती PDF स्वरूपात हवी असेल त्यांनी खालील डाउनलोड बटनाला क्लिक करून डाउनलोड करू शकता. 
                                        

इयत्ता पहिली अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click  Here 

इयत्ता दुसरी अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा.-  Click  Here 

इयत्ता तिसरी अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click  Here 

इयत्ता पाचवी  अध्ययन निष्पत्ती डाउनलोड करा. - Click  Here 

नवनवीन माहितीसाठी

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या