इ.5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर 2023 | Std 5th & Std 8 th Scholarship 2023 Result Announced

 इ.5 वी व इ. 8 वी  शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर 2023

Std 5th & Std 8 th Scholarship 2023 Result Announced
Std 5th & Std 8 th Scholarship 2023 Result Announced

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे  आयोजित करण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PUP) इ. 5 वी व उच्च  माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी )  2023 करण्यात आलेली होती . 

सदर परीक्षेचा निकाल  आज जाहीर करण्यात आलेला आहे. 

 खालील लिंक वर शाळेचा निकल पाहू शकता . 

🎯 अंतरिम निकाल २०२३

🎯  विद्यार्थी निकाल पहा

🎯 शाळेचा निकाल पहा
                
                                            
                                                                              

 
    



निकालासंबंधी सर्वसाधारण सूचना :-

1) शासन निर्णय क्र. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, दि. 15/11/2016 अन्वये फेब्रुवारी 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ऐवजी पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात आलेले आहे.

2) पात्रतेकरीता प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळविणे आवश्यक आहे. तथापि 39.5000 ते 39.9999 या दरम्यान शेकडा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या विषयासाठी 40% गुण गृहीत धरून पात्र घोषित करण्यात आले आहे.

3) रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आलेले आहेत.


4) पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

गुणपडताळणीबाबत सर्वसाधारण सूचना :-
1) गुणपडताळणी करणेबाबत परिषदेच्या https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

2) विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने उत्तरपत्रिकेची छायाप्रत अथवा डिजीटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही.

3) अंतरिम (तात्पुरता) निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी / शिक्षकांना शाळेच्या लॉगीनमधून गुणपडताळणी करण्यासाठी दिनांक ०९/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

4) गुणपडताळणी करणेबाबत विहित मुदतीनंतर अथवा ऑफलाईन पद्धतीने केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

5) गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु.50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

6) विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दिनांक ०९/०५/२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

7) विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल


नवनवीन माहितीसाठी -

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या