आकारीक नोंदी इयत्ता पहिली विषय कला

Akarik Nondi Std1st Subject Art

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. विकाक-2009/प्र.क्र.292/प्राशि-1, दि. 10 मे,2010 अन्वये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, दिनांक 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही.
सदर अधिनियमामधील कलम 29 (1) व (2) नुसार सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षापासूनइयत्ता पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय . सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन पद्धतींचा समावेश राहील.
आकारिक मूल्यमापन
"विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन"
सर्व शिक्षकांनी पुढील साधने-तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यासंबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.
1) दैनंदिन निरीक्षण.
2) तोंडीकाम :- प्रश्नोत्तरे , प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी
3) प्रात्यक्षिके/प्रयोग .
4) उपक्रम/कृती :- वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे
5) प्रकल्प
6) चाचणी :- वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिक स्वरूपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी/पुस्तकासह चाचणी (Open Book Test )
7) स्वाध्याय/वर्गकार्य :- माहितीलेखन, वर्णनलेखन, निबंधलेखन, अहवाललेखन, कथालेखन, पत्रलेखन,संवादलेखन व कल्पनाविस्तार इत्यादी.
8) इतर : प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयूंल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक - नोंदी
विषय - कला
· विविध
स्पर्धात सहभागीहोतो.
· वर्ग
सजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो.
· नृत्याची
विशेष आवड आहे.
· कार्यक्रमात
वैयक्तिकनृत्य सादर करतो.
· कार्यक्रमात
सामूहिकरीत्या नृत्य सादर करतो.
· चित्रात
सुंदर आकर्षक रंग भरतो. .
· गीते
तालासुरात व्यवस्थित सादर करतो.
· निरनिराळ्या
स्वरालंकाराची माहिती घेतो.
· संगीताबदद्ल
अभिरुची बाळगतो.
· चित्रकलेत
रुची घेतो, आवडीने चित्र काढतो.
· विविध
नृत्य प्रकारची माहिती सांगतो.
· सुंदर
नृत्य करतो. चित्रकलेची आवडआहे ,
· आकर्षक
चित्रे काढतो.
· हस्ताक्षर
सुंदर ठळक काढतो.
· कवितांना
स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
· मातीकाम
मन लाऊन आकर्षक करतो.
· मातीपासून
सुबक खेळणी तयार करतो.
· नाटकाची
पुस्तके आवडीने वाचतो.
· स्वतःच्या
कल्पनेने चित्र काढतो .
· गीताचे
साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.
· संवादाचे
सादरीकरण उत्तमरित्या करतो.
· कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन उत्तम करतो.
· राष्ट्रीय
कार्यक्रमात सहभागी होते.
· वैयक्तिक
गीत गायन उत्तम करतो.
· गीत
गायन स्पर्धेत सहभागी होतो.
· सामुहिक
गीत गायनात सहभागी होतो.
· नाट्यीकरणात
सहभागी होतो.
· मूक
अभिनय सादर करतो.
· आवडीच्या
वस्तूवर सुंदर नक्षीकाम करतो.
· पाहिलेल्या
घटनांचे हुबेहूब वर्णन करतो.
· समूहगीत
गायनात सहभागी होतो.
· स्वतःच्या
आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करतो.
· आत्मविश्वासाने
भाषणामध्ये सहभागी होते.
· आत्मविश्वासाने
नाटकामध्ये सहभागी होते.
· आत्मविश्वासाने
नाटकामध्ये सहभागी होते.
· कलेचे
विविध प्रकार समजून घेतो.
· मनातील
भाव व कल्पना चित्राद्वारे रेखाटतो.
· चित्रात
रंग भरताना रंगसंगती ओळखतो.
· चित्राच्या
प्रदर्शनात सहभाग घेतो.
· कलात्मक
दृष्टीकोन ठवतो.
· विविध
कलाप्रकारातील कौशल्ये प्राप्त करतो.
· कलेविषयी
मनापासून प्रेम बाळगतो.
· मातीपासून
विविध आकार बनवतो.
· कला
शिक्षणाचे महत्व समजून घेतो.
· विविध
स्पर्धात सहभागी होतो.
· वर्ग
सजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो.
· नृत्याची
विशेष आवड आहे.
· सुंदर
नृत्य करतो.
· चित्रकलेची
आवड आहे.
· चित्राचे
विविध प्रकार ओळखतो.
· सांस्कृतिक
कार्यक्रमात सहभागी होतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
अडथळ्याच्या - नोंदी
विषय - कला
· आत्मविश्वासाने
नाटकामध्ये सहभागी होत नाही.
· कलेचे
विविध प्रकार समजून घेत नाही.
· मनातील
भाव व कल्पना चित्रात रेखाटत नाही.
· चित्रात
रंग भरताना रंगसंगती ओळखत नाही.
· सर्व
चित्रे सुंदर काढत नाही.
· निरनिराळ्या
स्वरालंकाराची माहिती घेत नाही.
· चित्राचे
प्रमाणबद्ध रेखांटन करत नाही.
· मुक्तहस्त
कलाकृतीची रचना करत नाही.
· रंगाच्या
छटातील फरक ओळखत नाही.
· चित्राच्या
प्रदर्शनात सहभाग घेत नाही.
· कलात्मक
दृष्टीकोन ठवत नाही.
· विविध
कौशल्य प्राप्त करत नाही.
· कलेविषयी
मनापासून प्रेम बाळगत नाही.
· मातीपासून
विविध आकार बनवत नाही.
· संगीताबदद्ल
अभिरुची बाळगत नाही.
· चित्रकलेत
रुची घेत नाही.
· विविध
नृत्य प्रकारची माहिती सांगत नाही.
· टाळ्या
वाजवून संगीतमय नाद निर्माण करत नाही.
· आवडीच्या
वस्तूवर सुंदर नक्षीकाम करत नाही.
· पाहिलेल्या
घटनांचे हुबेहूब वर्णन करत नाही.
· समूहगीत
गायनात सहभागी होत नाही.
· स्वतःच्या
आवडीच्या वस्तूचे सुबक रेखांकन करत नाही.
· आत्मविश्वासाने
भाषणामध्ये सहभागी होत नाही.
· आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होत नाही.
0 टिप्पण्या