इयत्तानिहाय व विषयनिहाय तासिका इयता पहिली ते आठवी
जून 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. शैक्षणिक
वर्षाच्या सुरुवातीला शाळेमध्ये वर्गनिहाय कामाचे नियोजन चालू असते.
त्याचा महत्वाचा भाग म्हणजे विषयनिहाय व वर्गनिहाय तासिका माहीत असणे
महत्वाचे आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या इयत्तानिहाय व विषयनिहाय तासिका दिलेल्या
आहेत.
इयत्ता पहिली ते आठवी वर्गासाठी नमुना वेळापत्रक pdf स्वरूपात देण्याचा
प्रयत्न केलेला आहे. त्यात आपण सोयीनुसार वेळापत्रक बनवू
शकता.
इयत्ता निहाय व विषय निहाय तासिका खालील प्रमाणे आहेत.
विषयावर तासिका विभागणी
इयत्ता – पहिली व दुसरी
अ . क्र. | विषय | तासिका |
---|---|---|
१. | मराठी | १६ |
२. | इंग्रजी | ०७ |
3. | गणित | १३ |
४ . | कला | ०४ |
५. | कार्यानुभव | ०४ |
६. | आरोग्य व शा. शि. | ०४ |
एकूण | ४८ |
विषयावर तासिका विभागणी
इयत्ता – तिसरी व चौथी
अ . क्र. | विषय | तासिका |
---|---|---|
१. | मराठी | १२ |
२. | इंग्रजी | ०७ |
3. | गणित | ०९ |
४. | परिसर अभ्यास | १० |
५. | कला | ०३ |
६ . | कार्यानुभव | ०४ |
७ . | आरोग्य व शा. शि. | ०३ |
एकूण | ४८ |
विषयावर तासिका विभागणी
इयत्ता – पाचवी
अ . क्र. | विषय | तासिका |
---|---|---|
१. | मराठी | ०६ |
२. | हिंदी | ०६ |
३. | इंग्रजी | ०७ |
४. | गणित | ०८ |
५. | परिसर अभ्यास | १२ |
६. | कला | ०३ |
७. | कार्यानुभव | ०३ |
८. | आरोग्य व शा. शि. | ०३ |
एकूण | ४८ |
विषयावर तासिका विभागणी
इयत्ता – सहावी,सातवी व आठवी
अ . क्र. | विषय | तासिका |
---|---|---|
१. | मराठी | ०६ |
२. | हिंदी | ०६ |
३. | इंग्रजी | ०६ |
४. | गणित | ०७ |
५. | विज्ञान | ०७ |
६. | समाजशास्त्र | ०६ |
७. | कला | ०४ |
८. | कार्यानुभव | ०२ |
९. | आरोग्य व शा. शि. | ०४ |
एकूण | ४८ |
वरील इयत्ता निहाय व विषय निहाय तासिका pdf डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटणाला क्लिक करून डाउनलोड करू शकता .
💥 मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणे यांनी दिनांक 05 ऑक्टोबर 2017 रोजी परिपत्राकमध्ये खाली काही सूचना केलेल्या आहे.
१) इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका राहील.
२) एका वर्गाचा आठवडयाचा एकूण कार्यकाल पूर्वी २६.४५ मि. होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल २७.१० मि. होईल त्यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल.
३) दिनांक २८ एप्रिल, २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरूवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ १० मिनिटांचा राहील.
४) सुधारीत परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिकां ३० मिनिटांची राहील.
५) शनिवारी ५ तासिकांऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात. पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३० मिनिटांची राहील.
६) सुधारीत वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका हया कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात.
💥मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणे यांनी दिनांक 05 ऑक्टोबर 2017 रोजी परिपत्रक खालील लिंक वरुन डाउनलोड करू शकता.
💥 अत्यंत महत्वाचे :- इयत्ता पहिली ते आठवीसाठी उपयुक्त असणारे कोरे वेळापत्रक pdf डाउनलोड
करण्यासाठी डाऊनलोड बटनाला क्लिक करा.
नवनवीन माहितीसाठी :-
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link -
https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या