शाळा सोडल्याचा दाखला प्रति स्वाक्षरी बंद
![]() |
School Leaving Certificate Closed Counter Sign |
शालेय विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे असते. शालेय विद्यार्थ्यास एका जिल्ह्यातून अथवा राज्यातून , दुसऱ्या जिल्हयात अथवा राज्यातील दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास दाखल्याची गरज भासते.
तसेच CBSE / ICSE /IGCSE / IB या मंडळातील शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाशी संलग्न शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा झाल्यास अथवा राज्य मंडळाशी संलग्नित शाळेतून अन्य मंडळाशी संलग्नित शाळेत प्रवेश घ्यावयाचा झाल्यास, प्रचलित नियमानुसार शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक यांची प्रतिस्वाक्षरी घेणे आवश्यक होते.
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय दिनांक 19 सप्टेंबर 2016 नुसार शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नमुना सुधारित करण्यात आलेला असल्याने यामध्ये शाळा मान्यता क्रमांक तसेच युडायस क्रमांक यांचा उल्लेख शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असल्याने शाळा अनधिकृत आहे का ? हा प्रश्न निकाली निघाला आहे.
तसेच शाळा सोडल्याचा दाखला हा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेला असल्याने त्यावर पुन्हा प्रतिस्वाक्षरी घेण्याची गरज भासत नाही.
दिनांक 30 मे 2017 च्या शासन निर्णयानुसार शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक ) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करण्यात आहे. असे नमूद करण्यात आलेले आहे.
हा शासन निर्णय सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहील असेही नमूद करण्यात आलेले आहे.
प्रति स्वाक्षरी पध्दत बंद करण्याचा शासन निर्णय खालील डाउनलोड बटणाला क्लिक करून पाहू शकता.
शाळा सोडल्याचा सुधारित नमुना खाली दिलेला आहे. डाउनलोड बटणाला क्लिक करून डाउनलोड करू शकता.
नक्की पाहा - दहावी निकाल 2023
नक्की पाहा - बारावीचा निकाल 2023
नवनवीन माहितीसाठी -
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या