पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट | Pavitra Portal Teacher Recruitment Update

 पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट

Pavitra Portal Teacher Recruitment Update
Pavitra Portal Teacher Recruitment Update

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करीता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविणेबाबत.

खाजगी शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.१५.०१.२०२४ पर्यंत करणेबाबत सुविधा देण्यात आली होती. 

सद्यस्थितीत संकेतस्थळावर जाहितरात देण्याची कार्यवाही अद्याप सुरु असून सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दि.२२.०१.२०२४ पर्यंत सुविधा देण्यात येत आहे.

सबब आपल्या अधिनस्त नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरती करीता जाहितरात देण्याविषयक मुदतवाढ देण्यात आली असल्याच्या सविस्तर सूचना आपल्यास्तरावरुन देण्यात याव्यात.

तसेच सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. सदर बाबीस सर्व माध्यमांतून विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडे सादर करणेत यावा. असे शिक्षण सहसंचालक शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे यांनी केले आहे.  

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करीता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविणेबाबत. दिनांक १६ जानेवारी २०२४ चे परिपत्रक सविस्तर पहा. 



 

 💥 नवनवीन माहितीसाठी 💥 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

👇👇👇👇👇👇👇👇

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या