NMMS परीक्षा 2023 चा निकाल जाहीर | NMMS EXAM 2023 Result Declear

 NMMS परीक्षा 2023 चा निकाल जाहीर

NMMS EXAM 2024 Result Declear
NMMS EXAM 2024 Result Declear 


NMMS परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. निकाल खाली पाहू शकता. 


💥महत्वाची सूचना- निकाल पाहण्यासाठी  तुमचा रोल नंबर टाका व आईचे नाव टाका नंतर Search वर click करा व आपला निकाल पहा.

💥जिल्हानिहाय गुणवत्ता यादी पाहण्यासाठी - क्लिक करा 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २४ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दि. ०७/०२/२०२४ रोजी पासून पाहता येईल.

💥गुणयादी बाबत सूचना…..

1) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १६.०२.२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.

2) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.

3) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.

4) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.

5) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)

6) MAT विषयातील खाली नमूद केलेले २ प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT विषयास ८८ प्रश्न व SAT विषयास ९० प्रश्न असे एकूण १७८ पैकी गुणदान करण्यात आले आहे.

7) ज्या विद्यार्थ्यांचे प्रथम नाव / वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये पूर्ण बदल होत असेल अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येत आहे.

💥महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे निकाला संदर्भातील दिनांक 07 फेब्रुवारी 2024 प्रसिद्धी निवेदनातील सूचना खाली पाहू शकता. 


 

 💥 नवनवीन माहितीसाठी 💥 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

👇👇👇👇👇👇👇👇

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या