मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा | Quiz On Marathi Bhasha Gaurav Day

 मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

Quiz On  Marathi Raj Bhasha Gaurav Day
Quiz On  Marathi Raj Bhasha Gaurav Day

ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा आज (२७ फेब्रुवारी) जन्मदिवस. या निमित्तानं जगभरात २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा केला जातो. महाराष्ट्र, गोव्यासह जिथं कुठं मराठी भाषिक आहेत, तिथं आज अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

या दिवशी मराठी भाषिक एकमेकांना शुभेच्छा देतात. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून नमूद करण्यात आला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी कवितेला कुसुमाग्रजांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याची दखल घेऊन त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात. मराठी भाषेचं, साहित्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी या दिवशी सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव म्हणून सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही दिले जातात.
     या लेखात आपण मराठी भाषा गौरव दिनाचा प्रश्नमंजूषेच्या आधारे परिचय करून घेऊ.


चला तर मग विद्यार्थी , पालक, शिक्षक यांना नम्र आवाहन की सर्वांनी खालील प्रश्नमंजुषा सोडवावी . प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.


 
 
इतर विविध प्रश्नमंजुषा सोडवा - Click Here 

💥 नवनवीन माहितीसाठी 💥

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या