शिवजयंती प्रश्नमंजुषा स्पर्धा
![]() |
| Shiv Jayanti Quiz Competition |
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला.महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले होते. वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते.
शिवाजी महाराज हे मराठा सम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.त्यांनी 'गामिनी कावा ' तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रुंचा पराभव केला. 06 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झ्हाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना सामान न्याय व सामानतेची वागणूक दिली. दुर्दैवाने, 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराज्यांनी अखेरचा स्वा्श घेतला.
उत्तरेकडून मुघल बादशहा शाहजहान याने दख्खन से करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते.शहाजीराजांच्या जहागिरीचे जाव पुणे.विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते.शहाजीराजे अडचणीत सापडले होते.इकडे आड तिकडे विहीर!शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष आले.अशात जिजाबाई गरोदर होत्या ,तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे,हा प्रश्न उभा राहिला.शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली.जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले.शिवनेरी हा पुणे जिल्ह्यांतील जुन्नरजवळील किल्ला.त्यांच्या चारी बाजूंनी उंच कडे भक्कम ततबंधी आणि बळकट दरवाजे होते.किल्ला मोठा मजबूत होता.विजयराज हर त्याचे किल्लेदार होते.ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते.जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले.
आणि तो सोन्याचा दिवस उजाडला.फाल्गुन वद्य तृतीय शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०.शिवनेरीच्या नगारखान्यात सनई,चौघडा वाजत होता.अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला.किल्ल्यावर आनंदीआनंद झाला.बाळाचे बारसे झाले.शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव "शिवाजी" ठेवले.
" रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया
चाराणार्थी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया "
छत्रपती शिवाजी महाराज की जय "
या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारीत प्रश्नमंजूषेच्या आधारे परिचय करून घेऊ.
चला तर मग विद्यार्थी , पालक, शिक्षक यांना नम्र आवाहन की सर्वांनी खालील प्रश्नमंजुषा सोडवावी . प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
इतर विविध प्रश्नमंजुषा सोडवा - Click Here
💥 नवनवीन माहितीसाठी 💥
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
.jpg)
0 टिप्पण्या