इयत्ता 5 वी ,8 वी नवीन परीक्षा पध्दतीनुसार सराव प्रश्नपत्रिका | Class 5th, 8th practice question paper according to new exam pattern

 इयत्ता 5 वी ,8 वी नवीन परीक्षा पध्दतीनुसार सराव प्रश्नपत्रिका 

Class 5th, 8th practice question paper according to new exam pattern
Class 5th, 8th practice question paper according to new exam pattern

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ दिनांक १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कायद्यातील कलम-१६ मध्ये, कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केलेले आहे.

संदर्भ क्र. ५ अन्वये केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १६ मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे.संदर्भ क्र. ६ अन्वये महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील नियम- ३ व नियम- १० मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, तर त्यास

अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, तर त्याला इयत्ता ५ वी च्या वर्गात किंवा इयत्ता ८ वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती दिनांक 07 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. 


शासन निर्णय दिनांक 07 डिसेंबर 2023 -  

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 07 डिसेंबर 2023 चा डाउनलोड करा. Click Here 


या शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी साठी नमुना प्रश्नपत्रिका , संविधानतक्ता आणि उत्तर सूची डाउनलोड करा. 

या शासन निर्णयानुसार इयत्ता आठवी साठी नमुना प्रश्नपत्रिका , संविधानतक्ता आणि उत्तर सूची डाउनलोड करा. 




💥 नवनवीन माहितीसाठी 💥 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

👇👇👇👇👇👇👇👇

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या