आकारीक नोंदी इयत्ता पहिली विषय मराठी | Akarik Nondi Std 1st Subject Marathi

 आकारीक नोंदी इयत्ता पहिली विषय मराठी

Akarik Nondi Std 1st Subject Marathi
Akarik Nondi Std 1st Subject Marathi

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. विकाक-2009/प्र.क्र.292/प्राशि-1, दि. 10 मे,2010 अन्वये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, दिनांक 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही. 

सदर अधिनियमामधील कलम 29 (1) व (2) नुसार सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षापासूनइयत्ता पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. 

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय . सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन पद्धतींचा समावेश राहील.

 आकारिक मूल्यमापन

"विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन"

सर्व शिक्षकांनी पुढील साधने-तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यासंबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.

1) दैनंदिन निरीक्षण.

2) तोंडीकाम :- प्रश्नोत्तरे , प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी

3) प्रात्यक्षिके/प्रयोग .

4) उपक्रम/कृती :- वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे

5) प्रकल्प

6) चाचणी :-  वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिक स्वरूपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी/पुस्तकासह चाचणी (Open Book Test )

7) स्वाध्याय/वर्गकार्य :- माहितीलेखन, वर्णनलेखन, निबंधलेखन, अहवाललेखन, कथालेखन, पत्रलेखन,संवादलेखन व कल्पनाविस्तार इत्यादी

8) इतर : प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयूंल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने

 

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- मराठी

·      शब्द कार्डावरील शब्दांचे वाचन करतो.

·      वाक्य वाचन करतो. वाक्य वाचनाचा सराव करतो.

·      शब्द तयार करतो शब्दाचे वाचन करतो.

·      निरीक्षण करतो माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो .

·      कथा सांगतो चिञ काढतो

·      स्वतःच्या भाषेत गाणी गातो.

·      कथा सांगतो गाणी ऐकतो.

·      चिञकथा वाचन करतो. चिञाची माहिती सांगतो.

·      प्राणी पक्ष्याची माहिती सांगतो.

·      आवडीने मजकुराचे वाचन करतो.

·      गटामध्ये प्रकट वाचन करतो.

·      फलकावरील शब्द ओळखतो.

·      पाठ्यपुस्तकातील स्वध्याय सोडवतो.

·      शब्दाचे योग्य आकारात लेखन करतो.

·      शब्द व वाक्य यांचे अचूक लेखन वाचन करतो.

·      चिञ काढतो योग्य रंगात रंगवतो.

·      समान अक्षराच्या जोड्या लावतो.

·      स्वतःची माहिती नाव गाव पत्ता सांगतो.

·      प्राणीपक्षीवस्तूचे चिञ काढतो.

·      परीसरातील वेगवेगळ्या घटकाची माहिती सांगतो.

·      वर्ग मिञांशी संवाद करतो.

·      आकृत्यातील साम्यभेद ओळखतो.

·      नवीन अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो.

·      गीत गाणी तलासुरात म्हणतो.

·      वर्गातील वर्गकार्यात सक्रिय भाग घेतो.

·      आकृतीमध्ये रंग भरतो.

·      फलकावरील शब्दाचे वाचन लेखन करतो.

·      शब्द तयार करून वाचन करतो.

·      सांगितलेली गोष्ट कथा लक्षपूर्वक ऐकतो.

·      बडबड गीताचे गायन समुहात करतो.

 

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्यांच्या नोंदी

विषय :- मराठी

·      कविता तालासुरात म्हणता येत नाही.

·      संवाद ऐकतो पण विचारलेल्या प्रश्नांची उतरे चूक देतो.

·      मजकुर लक्षपूर्वक ऐकत नाही.

·      दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

·      शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

·      मजकुर ऐकतो पण उत्तर देत नाही.

·      प्रश्न तयार करता येत नाही.

·      चिञ पाहून प्रश्नाची उत्तरे देत नाही.

·      कथा ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.

·      लेखनात चूका करतो.

·      सुचविलेले भाग चूकीच्या पध्दतीने लावतो.

·      दिलेल्या भागाचे वाचन करताना अडखळतो.

·      गट व वर्ग कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही.

·      इतरांशी संवाद साधता येत नाही.

·      शब्द वाचन करताना अडखळतो.

·      बोलताना चूकीच्या शब्दाचा वापर करतो.

·      शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.

·      शब्द, वाक्य चूकीचे वापरतो.

·      बोलताना बोली भोषेतील शब्दाचा वापर करतो.

·      दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या