वर्णनात्मक प्रगतीपत्रक नोंदी - इयत्ता - पहिली - विषयनिहाय नोंदी

Akarik Nondi Subjetwise Class1st

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. विकाक-2009/प्र.क्र.292/प्राशि-1, दि. 10 मे,2010 अन्वये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, दिनांक 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही.
सदर अधिनियमामधील कलम 29 (1) व (2) नुसार सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षापासूनइयत्ता पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय . सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन पद्धतींचा समावेश राहील.
आकारिक मूल्यमापन
"विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन"
सर्व शिक्षकांनी पुढील साधने-तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यासंबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात.
1) दैनंदिन निरीक्षण.
2) तोंडीकाम :- प्रश्नोत्तरे , प्रकट वाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी
3) प्रात्यक्षिके/प्रयोग .
4) उपक्रम/कृती :- वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे
5) प्रकल्प
6) चाचणी :- वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिक स्वरूपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी/पुस्तकासह चाचणी (Open Book Test )
7) स्वाध्याय/वर्गकार्य :- माहितीलेखन, वर्णनलेखन, निबंधलेखन, अहवाललेखन, कथालेखन, पत्रलेखन,संवादलेखन व कल्पनाविस्तार इत्यादी
8) इतर : प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयूंल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने.
इयत्ता पहिलीसाठी वर्णनात्मक नोंदी विषयनिहाय खाली दिलेल्या आहेत. Click Here याला क्लिक करून पाहू शकता.
अ. क्र. | विषय | नोंदी |
---|---|---|
1 | मराठी | Click Here |
2 | इंग्रजी | Click Here |
3 | गणित | Click Here |
4 | कला | Click Here |
5 | कार्यानुभव | Click Here |
6 | शारीरिक शिक्षण | Click Here |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
प्रगतीपत्रक नोंदी
इयत्ता – पहिली
अ. क्र. | विषय | नोंदी |
---|---|---|
1 | विशेष प्रगती | Click Here |
2 | आवड /छंद | Click Here |
3 | आवश्यक सुधारणा | Click Here |
4 | व्यक्तिमत्व गुणविशेष | Click Here |
नवनवीन माहितीसाठी -
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ
शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या