सन 2024 - 25 साठी शाळा प्रवेशाचे वय अखेर निश्चित | School entry age for year 2024-25 finally fixed

 सन 2024 - 25 साठी शाळा प्रवेशाचे वय अखेर निश्चित

School entry age for year 2024-25 finally fixed
School entry age for year 2024-25 finally fixed

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज भरताना पालकांचा होणारा गोंधळ दूर होण्यास मदत होणार आहे. नर्सरी प्रवेशासाठी बालकाचे वय ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत किमान ३ वर्षे तर कमाल चार वर्ष पाच महिने ३० दिवस पूर्ण असणे आवश्यक आहे.

प्ले ग्रुप किंवा नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिली अशा विविध प्रवेश स्तरावर बालकांचे प्रवेश घेताना पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाने यापूर्वी मआरटीईफप्रवेशासाठी किमान वयोमर्यादा घोषित केली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शाळेत प्रवेश घेण्यासाठी बालकांचे किमान वय किती असावे, हे यापूर्वीच निश्चित केले आहे. परंतु आता किमान आणि कमाल अशी दोन्ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२४ ला किती असावी, हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. 

त्यानुसार आता प्लेग्रुप किंवा नर्सरीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चार वर्ष पाच महिने ३० दिवस पूर्ण, अशी कमाल मर्यादा असणार आहे. तर इयत्ता पहिलीसाठी सात वर्ष पाच महिने ३० दिवस, अशी वयोमर्यादा असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक यांचे परिपत्रक डाउनलोड करा. 




शाळेत दाखल करण्याचा फॉर्म - Download PDF



नवनवीन माहितीसाठी - 

खालील ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw

Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या