शाळेत दाखल करण्याचा फॉर्म
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेले आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही.
मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2023 - 24 साठी आरती 25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पुढीलप्रमाणे राहील असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री शरद गोसावी यांनी दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी पत्र काढून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
सन 2023 –24 या शैक्षणिक सत्रात इयत्ता पाहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकाचे वय
अ.क्र. |
प्रवेशाचा वर्ग |
वयोमर्यादा |
दि. 31 डिसेंबर
2023 रोजीचे किमान वय |
दि. 31 डिसेंबर
2023 रोजीचे कमाल वय |
1. |
प्ले ग्रुप
/ नर्सरी |
1 जुलै 2019 - 31 डिसेंबर
2020 |
3 वर्षे |
4 वर्ष 5 महिने 30 दिवस |
2. |
ज्युनियर केजी |
1 जुलै 2018 - 31 डिसेंबर
2019 |
4 वर्षे |
5 वर्ष 5 महिने 30 दिवस |
3. |
सिनियर केजी |
1 जुलै 2017 - 31 डिसेंबर
2018 |
5 वर्षे |
6 वर्ष 5 महिने 30 दिवस |
4. |
इयत्ता पहिली |
1 जुलै 2016 - 31 डिसेंबर 2017 |
6 वर्षे |
7 वर्ष 5 महिने 30 दिवस |
(संदर्भ :- शासन निर्णय महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्र.प्रवेश- 0123/प्र.क्र/03/एसडी- 02 मंत्रालय मुंबई-32 दिनांक 27 जानेवारी 2023)
या शासन निर्णयानुसार नवीन प्रवेश फॉर्म डाउनलोड करा.
हे ही नक्की वाचायला आवडेल - अध्ययन निष्पत्ती इयत्ता 1 ली
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री शरद गोसावी यांनी दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी पत्र इयत्ता पहिलीमध्ये दाखल करावयाच्या वयाबाबतचे पत्र खाली पाहू शकता.
संदर्भासाठी खालील परिपत्रक पहा.
हे ही नक्की वाचायला आवडेल - एक राज्य एक गणवेश योजना
हे ही नक्की वाचायला आवडेल - वर्णनात्मक प्रगतीपत्रक नोंदी इयत्ता पहिली विषयनिहाय नोंदी
नवनवीन माहितीसाठी -
खालील ग्रुप मध्ये सामील होऊ
शकता.
Whatsapp Group Link - https://chat.whatsapp.com/BzEMSOuUCHh4fNDTkYUQqw
Telegram Group Link - https://t.me/+8M9UPC68PIA2NTFl
0 टिप्पण्या